लातूरचा डंका संपूर्ण महाराष्ट्रात: पठ्याने मिळवले तब्बल ८८ लाख रुपयांचे पॅकेज

लातूरचा डंका संपूर्ण महाराष्ट्रात: पठ्याने मिळवले तब्बल ८८ लाख रुपयांचे पॅकेज

 


दिल्ली आयआयटी (IIT DELHI) मध्ये शिक्षण घेत असलेला लातूरचा विद्यार्थी "अनिरुद्ध अशोक कुलकर्णी" याची आयआयटी दिल्ली मधून बस द्वारे निवड होऊन त्याला बेंगलोरच्या कंपनीने तब्बल ८८ लाख रुपयांचे पॅकेज दिले आहे.

अनिरुद्ध अशोक कुलकर्णी हा सर्वाधिक पॅकेज मिळालेला इंजिनियर म्हणून ओळख निर्माण झाली आहे. मूळचा लातूर येथे रहिवासी असलेला आणि सध्या आयआयटी दिल्ली मध्ये शिक्षण घेत असलेला अनिरुद्ध कुलकर्णी हा कॉम्प्युटर सायन्सच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत असून त्याला कॅम्पस मुलाखतीद्वारे बँगलोर येथील नामांकित कंपनी "काँटबॉक्स संशोधन केंद्र" या कंपनीसाठी कोअर अभियांत्रिकी विश्लेषक म्हणून निवड झाली आहे. ही नामांकित कंपनी आर्थिक व वित्त क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. काँटबॉक्स संशोधन केंद्र या कंपनीने माहिती दिली आहे की अनिरुद्ध अशोक कुलकर्णी हा दिनांक ८ जुलै २०२४ पासून तो या कंपनीच्या सेवेत रुजू होऊ शकतो व त्याच्या पदाचा कारभार सांभाळू शकतो.

कौतुकच: फक्त दोन महिन्यासाठी मिळाले होते ३२ लाखांचे पॅकेज...

अनिरुद्ध अशोक कुलकर्णी यांनी अशी माहिती दिली आहे की अंतिम वर्षाचे शिक्षण घेत असताना अनुभव येण्यासाठी विद्यार्थ्याला एखाद्या कंपनीमध्ये काम करावे लागते व त्यामध्ये अनिरुद्ध कुलकर्णी याची नेदरलँड येथील एका नामांकित वित्त क्षेत्रात काम करणार्या कंपनीमध्ये मे २०२३ मध्ये निवड झाली होती तर त्या कंपनीने त्याला फक्त दोन महिने काम करण्यासाठी तब्बल ३२ लाख रुपयांचे पॅकेज ची ऑफर दिली होती.

त्याने त्या कंपनीची ऑफर स्वीकारून तिथे त्या कंपनीमध्ये फक्त ५० दिवस काम केले व ३२ लाख रुपयांची पॅकेज स्वीकारले होते. अनिरुद्ध कुलकर्णी असे सांगितले होते की आयआयटी दिल्ली येथे झालेल्या मुलाखत त्याच्यासाठी एक फार मोठा अनुभव असू शकतो व चांगला अनुभव यामधून त्याला मिळाला. आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये काम करायचे आहे त्याच क्षेत्रात मध्ये काम करणाऱ्या कंपनीमध्ये निवड झाली पाहिजे हाही एक खूप मोठा महत्त्वाचा पॉईंट असू शकतो.

पण आपण प्रयत्न केले की यश नक्कीच मिळते असे आणि अनिरुद्ध चे म्हणणे आहे आपण शिक्षण घेत असलेल्या क्षेत्रांमध्ये आपल्याला पूर्ण माहिती असणे हेही तेवढेच फार गरजेचे असते असे अनिरुद्ध कुलकर्णी यांचे म्हणणे आहे. मिळालेल्या पॅकेजचा माझ्यासाठी व माझ्या कुटुंबासाठी हा दिवस खूप आनंदाचा ठरला आहे
 - अनिरुद्ध कुलकर्णी, आयआयटी दिल्ली.

आयआयटी दिल्लीमध्ये शुक्रवार सकाळपासून सर्व कंपन्यांच्या मुलाखतीला सुरुवात झाली होती. शुक्रवार सकाळी सहा वाजल्यापासून चालू झालेल्या या मुलाखती मधून अनिरुद्ध अशोक कुलकर्णी हा सर्वाधिक पॅकेज मिळालेला विद्यार्थी आहे.

अनिरुद्ध अशोक कुलकर्णी, लातूर येथील रहिवासी असून त्याचे प्राथमिक शिक्षण श्री किशन सोमानी विद्यालय लातूर येथून पूर्ण झाले आहे. त्याचे उच्च व माध्यमिक शिक्षण हे नवोदय विद्यालय लातूर येथून पूर्ण झाले आहे व त्यानंतर नवोदय विद्यालय कोट्यम (केरळ) येथून झालेली आहे.

अनिरुद्ध अनिरुद्ध अशोक कुलकर्णी याने नेदरलँड कंपनीमध्ये ५० दिवसांसाठी ३२ लाख पॅकेज मिळालेल्या कंपनीचे खूप अनुभव सांगितले आहे. त्यांनाही सांगितले की त्या कंपनीमध्ये त्याला काम करून खूप काही असे मिळवता आले आहे त्यांनी खूप अनुभव घेतला आहे तेथील कामाची पद्धत कटीबद्धता नियम सर्व काही त्याने अनुभव बघितले आहेत.

शिक्षण घेतले की त्याचा फायदा होतोच असे अनिरुद्ध यांच्या परिवाराचे म्हणणे आहे व अनिरुद्ध ला एवढे मोठे पॅकेज मिळाल्यामुळे त्याचा संपूर्ण परिवार खूप आनंदी आहे. काँटबॉक्स कंपनीने असेही सांगितले आहे की अनुरुद्ध त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ०८ जुलै २०२४ च्या नंतर कंपनीमध्ये कार्यरत होऊ शकतो. त्याने केलेल्या आधीच्या कामाचा त्याला येथे अनुभव होऊ शकतो असे म्हणण्यात आले आहे

सध्या चालू असलेल्या जागतिक महामंदीच्या पार्श्वभूमीवर बेरोजगारांची संख्या खूप वाढत असतानाही अनिरुद्ध अशोक कुलकर्णी हा तब्बल ८८ लाख रुपये मिळवणारा विद्यार्थी ठरला असून याचे सर्वत्र चर्चा होत आहे व अनिरुद्ध कुलकर्णी याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

लातूरकरांसाठी ही गर्वाची गोष्ट असून लातूरकर त्यांचे तोंड भरून कौतुक करत आहे....

Post a Comment

0 Comments