राहुल द्रविड चा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ वाढला बघा काय म्हटले सौरभ गांगुली

राहुल द्रविड चा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ वाढला बघा काय म्हटले सौरभ गांगुली...


भारतीय क्रिकेट टीम चे माजी कर्णधार व बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी भारतीय टीमच्या कोच पदी राहुल द्रविड यांचा कार्यकाळ वाढल्याने प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ वर्ल्ड कप 2023 पर्यंतच होता परंतु बीसीसीआयने त्यांना टीमचे प्रशिक्षण राहण्याची ऑफर दिली आणि त्यांचे करार वाढवण्यास सांगितले व राहुल द्रविड पुढील येणाऱ्या सामन्या साठी टीम इंडियाचे प्रशिक्षक राहावे अशी विनंती केली आहे व टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी ते मान्य केले आहे.

बीसीसीआय (BCCI) ला यांना कायम प्रशिक्षक म्हणून ठेवायचे होते जेणेकरून त्यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये आतापर्यंत बनवलेली सर्व क्रिकेट टीम व खेळाडू यांच्यामध्ये कोणताही बदल होऊ नये. नवीन प्रशिक्षक आल्यानंतर सर्व संघावर व खेळाडूंवर परिणाम होऊ शकला असता असे म्हणणे आहे.

द्रविड यांनी घेतलेल्या मेहनतीने विश्वचषक 2023 मध्ये सर्व भारतीयांनी टीम इंडियाचे निकाल बघितले आहे व आभार मानले आहे.

भारतीय संघाचे माजी कर्णधार बीसीसीआय चे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी कोलकत्ता येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मी राहुल द्रविडच्या प्रशिक्षक पदाची नियुक्ती बद्दल माहिती दिली होती असे पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. बीसीसीआय बोर्डाने राहुल द्रविड वर पुन्हा एकदा विश्वास दाखवल्याने यामध्ये मला वेगळे असं काहीही वाटले नाही. मी मंडळाचा अध्यक्ष असताना त्यांनाही काम दिले होते व राहुल द्रविड यांचा कार्यकाळ वाढल्याने मला खूप आनंद झाला आहे असे सौरभ गांगुली यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.

यांनी हे काम समोर करायचे आहे की नाही करायचे हे त्यांच्यावर अवलंबून होते जून मध्ये होणाऱ्या आणखीन एका विश्वचषकासाठी मी राहुल द्रविड व भारतीय क्रिकेट संघ यांना शुभेच्छा देतो. यावेळी आपण विश्वचषक 2023 जिंकण्याच्या खूप जवळ होतो परंतु आपण जिंकलो नसलो तरीही भारतीय संघ हा सर्वोत्तम होता व आहे म्हणण्यास काहीही हरकत नाही. पुढील विश्वचषकासाठी पूर्णपणे सात महिने मिळाले आहेत अशा वेळी भारतीय संघ हा उपविजेता नाही तर चॅम्पियन होईल याची खात्री आहे.

संघाचे कोच राहुल द्रविड यांनी बीसीसीआयचे मनापासून आभार मानले आहे मात्र त्यांनी अद्यापही कुठल्याही करारावर अधिकृतपणे स्वाक्षरी केली नसल्याचेही सांगत आहे.

संघाला परिपूर्ण प्रशिक्षक मिळाल्या असल्याने भारतीय संघातील सर्व खेळाडू व बोर्ड मेंबर खुश असल्याचे सांगितले जात आहे. जून मध्ये होणाऱ्या विश्वचषकामध्ये आम्ही पूर्णपणे खऱ्याने उतरू असे म्हटले जात आहे व आम्ही पूर्ण तयारी करून विश्वचषक जिंकून दाखवू असेही सांगितले.


Post a Comment

0 Comments