अखेर इंडिया आघाडीच्या बैठकीचा मुहूर्त ठरला: १७ डिसेंबर रोजी होणार बैठक

अखेर इंडिया आघाडीच्या बैठकीचा मुहूर्त ठरला: १७ डिसेंबर रोजी होणार बैठक

  

India Alliance Meeting: आत्ताच लागलेल्या पाच राज्यातील निकालानंतर आगामी निवडणुकांसाठी इंडिया आघाडीची बैठक ६ डिसेंबर रोजी होणार होती परंतु सध्या चालू असलेल्या मीचोंग चक्रीवादळामुळे (Michong cyclone) ही बैठक रद्द करण्यात आली. इंडिया आघाडीची बैठक बुधवारी दिल्ली येथे पार पडणार होती. मात्र विरोधी पक्षातील बैठकीत पक्षांतर्गत चर्चेमध्ये बिघाड झाल्याची अशी माहिती समोर येत आहे.

भाजप विरोधात सर्व पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली होती. या आघाडी स्थापने वेळी महाराष्ट्रातील व भारतातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. आत्ताच लागलेल्या पाच राज्यातील निकालानंतर सर्व विरोधी पक्षातील नेत्यांची हिरमोड झाल्याचे समोर येत आहे. आताच्या लागलेल्या निकालात तीन राज्यांमध्ये भाजपाला बहुमत मिळाल्याने इंडिया अलायन्समध्ये एकत्रपणा दिसून येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. इंडिया अलायन्स बैठकीमध्ये नितीश कुमार, ममता बॅनर्जी उपस्थित राहणार आहेत. आत्ताच ठरलेल्या बैठकीमध्ये तमिळनाडूचे एम के स्ट्यलिन गैरहजर राहणार होते. चालू असलेल्या चक्रीवादळामुळे व दिग्गज नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे ही मीटिंग समोर ढकलल्याचे दिसून येत आहे. आता ही बैठक १७ डिसेंबर रोजी पार पडणार आहे.

आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा विरोधात सर्व पक्ष एकत्र येऊन निवडणुकीची रणनीती तयार करण्यासाठी दिल्ली येथे सहा डिसेंबर रोजी इंडिया अलायन्स आघाडीची बैठक ठरली होती. या लोकसभा निवडणूक पक्षाने मुख्य भूमिका बजावत ही बैठक काँग्रेस पक्षाने बोलवली होती व विरोधातील सर्व पक्षांना व दिग्गज नेत्यांना आमंत्रित केले होते व महाराष्ट्र व इतर राज्यमधील बडे नेते सहभागी होणार होते. परंतु सध्या ही बैठक थांबवण्यात आली आहे.

काँग्रेस पक्षाने असेही सांगितले आहे की काही नेते उपस्थित राहू शकले नाही तरी त्या ठिकाणी एक अनौपचारिक बैठक होणार आहे. आता झालेल्या  पाच राज्यांमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस फक्त तेलंगणा राज्यात आपली सत्ता स्थापन शकली आहे व इतर राज्यामध्ये काँग्रेस व इतर पक्षाचा दारुण पराभव झाल्याचे दिसून आले आहे. आताच्या लागलेल्या विधानसभा निवडणूक मध्ये भाजपची एक हाती सत्ता आल्यामुळे इंडिया आलायस बैठकीमध्ये व छोट्या पक्षांमध्ये नाराजी वाढली आहे असे दिसून येत आहे.

काँग्रेसचा असलेला बालेकिल्ला राजस्थानमध्येही काँग्रेस पक्षाचा धरून पराभव झाला आहे तसेच मध्य प्रदेश व छत्तीसगड या राज्यांमध्येही काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला आहे. 

आत्ताच निवडणुका झालेल्या पाच राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाने घटक पक्षांना विश्वासात घेतले नाही अशा तक्रारी दिग्गज नेत्यांकडून होत आहे व त्यामुळे पराभव झाला असेही त्यांचे म्हणणे आहे. ममता बॅनर्जी, अखिलेश यादव व नितीश कुमार यांनी या निकालानंतर काँग्रेस पक्षांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच तमिळनाडूचे सध्याचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांनीही मी काही कारणास्तव उपस्थित राहू शकणार नाही असे काँग्रेस पक्षाला व इंडिया अलायन्स बैठकीला कळवले होते.

मोदी सरकार विरोधात सत्ता स्थापन करायचे असेल तर सर्वांना एकत्र यावे लागेल व आपले वर्चस्व या सरकार विरोधात निर्माण करावे लागेल असे इंडिया अलायन्स बैठकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने सर्वांना सांगण्यात आले.

येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये इंडिया अलायन्स बैठकीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपाचा मुद्दा चर्चेमध्ये होऊ शकतो. कुठल्या राज्यात कुठल्या पक्षाने किती जागा लढवायच्या आहेत याबाबतीत मीटिंगमध्ये चर्चा होणार आहे अशी माहिती समोर आली. निवडणुकांमध्ये घटक पक्ष सोबत घ्यावयाची आहे असेही सांगितले जाते. इंडिया आघाडी बैठकीमध्ये १४ सदस्य समिती निर्णय घेईल असेही होऊ शकते. या समितीमध्ये सर्व पक्षांच्या दिग्गज नेत्यांचा सहभाग असू शकतो. आता होणाऱ्या मीटिंगमध्ये घटक पक्षांची व नाराज असलेल्या बड्या नेत्यांची नाराजी दूर होईल अशी अपेक्षा इंडिया आघाडी बैठकी मध्ये सांगितले आहे. ही बैठक महत्त्वाची असून यामध्ये निवडणुकांचे सर्व प्लॅन आखले जाणार आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी दिल्लीमध्ये होणार असलेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. इंडिया आघाडीच्या मागील बैठकीमध्ये महाराष्ट्रातील श्री शरद पवार, श्री संजय राऊत, श्री आदित्य ठाकरे, व श्री अशोक चव्हाण या सर्व दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. इतर राज्यातील वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments