रणबीरच्या "ॲनिमल" चा वाद थेट संसदेत: खासदारची मुलगी रडत थेटरमधून बाहेर पडली

रणबीरच्या "ॲनिमल" चा वाद थेट संसदेत: खासदारची मुलगी रडत थेटरमधून बाहेर पडली


ॲनिमल: आत्ताच प्रदर्शित झालेला चित्रपट "ॲनिमल" हा खूपच चर्चेत आला आहे. या चित्रपटांमध्ये रणवीर कपूर यांनी हिरो म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या चित्रपटावर आता राजकीय संकट येतानाचे दिसून येत आहे या चित्रपटाचा उल्लेख आता डायरेक्ट संसदेमध्ये झाला आहे.

संदीप रेड्डी वांगा (डायरेक्टर ) चित्रपट बनवला असून या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे तर दुसरीकडे या चित्रपटांमधील दाखवलेले काही सीन्स व डायलॉग वरून खूप टीका होत आहे. हा चित्रपट महिलांच्या विरोधी असल्याचे दाखवून दिले जात आहे यावर सोशल मीडियावर अनेकांनी टीका केल्या आहेत. याच ॲनिमल चित्रपटाचा वाद आता थेट संसदेमध्ये पोहोचला आहे.

छत्तीसगडच्या काँग्रेसच्या असलेल्या खासदार रंजीत रंजन यांनी या ॲनिमल चित्रपटावर जोरदार टीका केली आहे. या चित्रपटातील कॉन्टॅक्ट सीन्स डायलॉग यावर त्यांनी खडसावून टीका केली आहे. खासदार रंजीत रंजन यांनी असे सांगितले आहे की त्यांची मुलगी चित्रपट बघायला गेल्यास व तिने हा चित्रपट आर्धाच बघितला ती रडत थेटर मधून बाहेर आली असं त्यांनी म्हटलं आहे.

चित्रपट हा समाजाचा आरसा असतो आम्हीही लहानपणापासून चित्रपट बघत आलोय अशा चित्रपटामुळे तरुणाई खूप बिघडत जात आहे. "कबीर सिंग", "पुष्पा" व आता "ॲनिमल" अशा या चित्रपटामुळे तरुणाईवर खूप मोठे परिणाम दिसून येत आहे. त्यामध्ये हिंसा दाखवली आहे महिलेचा विनयभंग दाखवलेला आहे अशा प्रकारचा जर संदेश समाजात जात असेल तर तो चित्रपट काय म्हणून रिलीज करावा या चित्रपटातून तरुणाईवर काय परिणाम होईल याचा विचार करायला हवा. शाहिद कपूर याचा कपिल सिंग हा चित्रपट बघा या चित्रपटांमध्ये असे दाखवले आहे की तो जो करतो ते योग्यच करतो परंतु त्या चित्रपटांमध्ये त्याच्या पत्नीशी, लोकांशी व समाजाशी तो कसा वागतो यावरही विचार केला पाहिजे, अशा चित्रपटाला विरोध केला पाहिजे. या शब्दामध्ये रंजीत रंजना यांनी त्यांचा तीव्र असलेला संताप व्यक्त केला आहे. फक्त रंजीत रंजना च नाही तर गायक स्वानंद किरकिरे यांनीही या चित्रपटाविरुद्ध जोरदार टीका केली आहे.

ॲनिमल या चित्रपटामध्ये या अभिनेत्यांनी काम केले आहे

१) रणबिर कपूर
२) अनिल कपूर
३) बॉबी देवल
४) रश्मिका मंदाना
५) तृप्ती डीमरी
६) उपेंद्र लिमये
७) संदीप रेड्डी वांगा (डायरेक्टर)


१ डिसेंबर रोजी रणबीर कपूरचा "ॲनिमल" चित्रपट सर्व टॉकीज मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या टिझर पासून रणबीर कपूरच्या चाहत्यांना हा चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित होण्याची खूप आवड निर्माण झाली होती. त्यामुळे या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंगही खूप मोठ्या प्रमाणात झाली होती व चाहत्यांकडून या चित्रपटाला खूप मोठा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. ॲनिमल चित्रपटाने पठाण, जवान अशा या चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले आहे.

या चित्रपटांमध्ये अभिनेता धर्मेंद्र यांचा मुलगा बॉबी देवल हा ही एक रोल करत आहे व त्याचा लुक हा त्याच्या चाहत्यांना खूप आवडला असून त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या चित्रपटांमध्ये काही सीन्स समाजासाठी अत्यंत परिणामकारक आहे असे दाखवले आहे. जसे की रणवीर कपूर महाविद्यालयांमध्ये घेऊन जातो व वर्गामध्ये ती गण चालवतो. या चित्रपटांमध्ये असेही दाखवले आहे की स्टील इंडस्ट्रीसाठी भावा भावामध्ये भांडण लागते व तेच भांडण घरामधल्या प्रमुख माणसाच्या जीवावर बेतल्याचे दाखवले आहे.

ॲनिमल या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये सध्या खूप मोठी कमाई केली आहे व नावही केले आहे. सहा दिवसांमध्ये तब्बल ५०० करोड रुपये या चित्रपटाची कमाई झाल्याचे दिसून येत आहे.

ॲनिमल या चित्रपटातील ॲक्शन सिनला चित्रपटात ग्रहांमध्ये चहा त्यांनी खूप मस्ती करून त्यांचा आनंद व्यक्त केला आहे. व चित्रपटातील सर्व गाण्यांना चाहत्यांनी खूप पसंत केले आहे.

रणबिर कपूरच्या या ॲनिमल चित्रपटांमध्ये मराठमोळा उपेंद्र लिमये यानेही भूमिका बजावली आहे व त्यामुळे उपेंद्र लिमये याचीही चर्चा सर्वत्र खूप मोठ्या प्रमाणात होत आहे व उपेंद्र लिमये याच्या चाहत्याकडून त्याचे कौतुक केले जात आहे.

या चित्रपटामध्ये बॉबी देवल यांनी अबरार हक ही भूमिका निभावली आहे. बॉबी देवल याची चित्रपटाच्या शेवटी छोटीशी भूमिका केली आहे या छोट्याशा भूमी भूमिकेमध्ये त्याने त्याच्या चाहत्यांवर विशेष अशी छाप टाकली आहे व त्यांनी शेवटी त्या चित्रपटाला एक वेगळाच रंग आणून दिला आहे. देऊन हा अभिनेता सनी देओलचा छोटा भाऊ आहे.

बॉबी देवल याच्या भूमिके नंतर त्याच्या परिवाराने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

बॉबी देवल याची आई प्रकाश कौर हिने असं म्हटले आहे की या चित्रपटाचा शेवटी माझ्या मुलाला मी मरताना बघू शकत नाही व तिनं या गोष्टीवरून बॉबी देवल ला फटकारले आहे असे बॉबीने सांगितले पण ती बॉबीने केलेल्या भूमिकेवर खूप खुश आहे असे तिने सांगितले. त्याच्या आईने सांगितले आहे की "रॉकी और राणी की प्रेम कहानी" या चित्रपटात बॉबी देओलच्या वडिलांचा निधनाचा सीन होऊ शकली नाही तसेच काही या चित्रपटातही झाला आहे व ते त्याच्या आईला सहन झाले नाही असे चित्रपट करत जाऊ नकोस मी पाहू शकत नाही असेही ती म्हटली आहे परंतु बॉबी देवलने तिची समजूत काढत सांगितले आहे हे बघ मी तुझ्यासमोर उभा आहे तो फक्त एक छोटासा अभिनय होता असे सांगून त्यांनी त्याच्या आईची समजूत काढली.

ॲनिमल फेम तृप्ती डीमरी हिने चित्रपटात खूप छान भूमिकांनी केली आहे. तृप्तीला तिच्या चाहात्या कडून सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सध्या ॲनिमल, चित्रपटगृहामध्ये चांगल्या प्रकारे कमाई करत आहे व सर्व तरुणांमध्ये त्यांनी या चित्रपटाचे वेड लावले आहे. 

Post a Comment

0 Comments