मध्यरात्री कान दुखायला लागला: तर करा हे घरगुती उपाय

मध्यरात्री कान दुखायला लागला तर करा हे घरगुती उपायमित्रांनो असं बरेच वेळेस होतं की सकाळी काही दुखत नाही पण रात्री अचानक काही ना काही तरी त्रास चालू होतो. त्या वेळेला आपण काय करायचं हे कळत नसते व आपण खूप गोंधळून जातो.

अशाच वेळी मध्यरात्री समजा तुमचा कान दुखायला लागला तर घाबरून जाऊ नका. करा हे घरगुती उपाय ज्यामुळे तुमच्या कानाला तात्काळ आराम मिळेल.

कान दुखल्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो काही सुचत नाही झोप लागत नाही ताप येते व सर्व मानसिक संतुलन बिघडून जाते यामुळे काय करावे काय नाही असे होऊन जाते. काहींना चिडचिडापणा होतो कमी ऐकायला जाते त्या कानामधून कधी कधी घाण पाणी सुद्धा निघते. अशावेळी आपण घरगुती उपाय करायला पाहिजे जेणेकरून आपला त्रास कमी होऊन आपल्याला आराम मिळेल.

बघा खालील घरगुती उपाय:-

१) कांदा: जर रात्री अचानक तुम्हाला कान दुखायला असं वाटत असेल तर घरातील कांद्याचा एक चमचा रस करून घ्या. त्या कांद्याच्या रसाला थोडे कोमट करून घ्या व त्या कांद्याच्या रसाचे दोन ते तीन थेंब तुमच्या कानामध्ये टाका असं दिवसातून तुम्ही दोन-तीन वेळा केल्यास तुम्हाला आराम वाटेल व कानाचा त्रास बंद होऊन जाईल.

२) लसूण: कांद्यासोबतच लसूणही कान दुखण्याचा त्रास कमी करण्यासाठी फार उपायकारक ठरतो. लसुन चा उपाय करण्यासाठी लसणाचे दोन ते तीन तुकडे घ्या त्या तुकड्याला बारीक करून घ्या व बारीक झालेल्या तुकड्यांमध्ये दोन ते तीन चमचे मोहरीचे तेल घाला. मोहरीचे तेल घातल्यानंतर त्याला गॅसवर कमी हवेवर थोडा वेळ शिजवून घ्या. तेल शिजवून घेतल्यानंतर त्याला थोडा वेळ कोमट होऊ द्या जेणेकरून कानाला चटका बसणार नाही. तेल थंड झाल्यास त्या तेलाचे दोन ते तीन थेंब हे कानामध्ये टाका त्यानंतर तुमच्या कामाचा त्रास हळूहळू कमी होऊन जाईल.

३) मोहरीचे तेल: मोहरीचे तेल हेही कान दुखी त्रासापासून खूप दूर करते. मोहरीचे तेल कान दुखीवर फार गुणकारक आहे. कामाचा त्रास दूर होण्यासाठी मोहरीच्या तेलाचे दोन ते तीन थेंब हे तुमच्या कानामध्ये टाका व १५ मिनिट तसाच ठेवा त्यानंतर तुमचा कान दुखण्याचा पूर्णपणे बंद होऊन जाईल.

४) पेपरमिंट: कान दुखी साठी बऱ्याच वेळा घरगुती उपाय म्हणून पेपरमिंट चा वापर केला जातो. तुमचा उपाय करण्यासाठी पुदिन्याची थोडी पाने घेऊन त्याचा रस तयार करून घ्या आणि या पुदिन्याच्या पानाचा रस एक ते दोन थेंब कानामध्ये टाका त्यानंतर तुम्हाला आराम मिळेल.

अद्रक खाल्ल्याने होतात भरपूर फायदे


हिवाळ्यात अद्रक खाल्ल्याने भरपूर फायदे होतात. खाल्लेल्या अद्रकेमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती एकदम मजबूत होते व यापासून कुठल्याही रोगांशी लढण्याची शरीराची ताकत असते. शरीर सक्षम होते व निरोगी राहते या कारणामुळे हिवाळ्यामध्ये आद्रक खाण्याचा सल्ला दिला जातो.

हिवाळ्यामध्ये तर सर्दीच नाही तर खोकला ताप हा आजार पटकन आपल्या शरीराला लागू होतो. सर्व पासून दूर राहण्यासाठी आपले शरीर एकदम निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो या चालू असलेल्या ऋतूमध्ये खाण्याचे प्रमाण वाढले की शरीर एकदम तंदुरुस्त राहते. अद्रक हे थंडीमध्ये फार उपयकारक ठरते. अद्रकी मध्ये सोडियम, अँटी इंफ्लोमेट्री, ऑक्सिडंट व्हिटॅमिन बी, सी विटामिन सी, फोलेट,मॅग्नेशियम आणि झिंक यासारखे गुणधर्म असलेले अद्रक हिवाळ्यात अनेक आजारापासून बचाव करते.

हिवाळ्यामध्ये अद्रक खाल्ल्यास त्याचे होणारे फायदे:

१) सर्दी व खोकल्यापासून आराम:

हिवाळ्यामध्ये अद्रक खाल्ल्याने सर्दी पासून व खोकल्यापासून आराम मिळतो. आयुर्वेदामध्ये अद्रकिला खूप मोठे स्थान आहे. अद्रक् हे आयुर्वेदात फायदेशीर मानले जाते.
अद्रक खाल्ल्याने सर्दी होत नाही आणि शरीर संसर्गापासून स्वतःचे रक्षण होते. हिवाळ्यामध्ये अद्रकीचा चहा व काढा पिल्याने भरपूर फायदे होतात.

२) रोगप्रतिकार शक्ती वाढते:

हिवाळा या ऋतू मध्ये अद्रक खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती खूप वाढते व शरीर तंदुरुस्त राहते.

३) फॅटी लिव्हरच्या समस्येपासून सुटका:

हिवाळा ऋतूमध्ये गरम चहा किंवा काढा मध्ये थोडासा अद्रकीचा तुकडा घातल्यास ते पिऊन घेतल्यानंतर फायदेशीर मानले जाते. जेवना नंतर एक तासानंतर याचे प्राशन करावे. यानंतर फॅटी लिव्हरची समस्या हळूहळू दूर होऊ लागते.

४) बधकोष्ठता दूर होते:

साधारण हिवाळ्यामध्ये प्रत्येकाच्या जेवणामध्ये बदल होतोच. जेवणामध्ये बदल झाल्याने गॅस, अपचन, बद्धकोष्टता अशा प्रकारची समस्या उद्भवते व या समस्येमुळे लोक हैराण होऊन जातात अशा परिस्थितीमध्ये अद्रकीचे सेवन केल्यास या सर्व समस्या पासून आराम मिळू शकतो.

Post a Comment

0 Comments