जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालू होणार: मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी
मराठवाड्यातील लोकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस आता जालना ते मुंबई अशी धावणार आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी ही फार सुखकारक रेल्वे असून कमी वेळेमध्ये जास्त अंतर कापण्यासाठी खूप मदत होणार आहे.
साधारण बाबतीत बघितल्यास मराठवाडा विभाग इतर विभागाच्या तुलनेत फार कमी विकसित आहे या विभागात शासकीय योजना राबवण्याचे फार कमी प्रमाण असते. मात्र आता रेल्वे विभागाने मराठवाड्यावर लक्ष घातल्याने वंदे भारत एक्सप्रेस जालना ते मुंबई या मार्गावर चालू केल्यावर या मार्गावर प्रवास करणाऱ्या लोकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
मराठवाड्यातील व्यावसायिक व नोकरदार वर्ग मुंबईमध्ये येत जात असतो. काहीजण मंत्रालयीन कामासाठी येतात तर काहीजण वैयक्तिक कामासाठी येतात आता त्यांचा प्रवास हा सुखाचा व्हावा यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबई जालना या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू होणार असल्याचे सांगितले होते व या मार्गासाठी रेल्वेचे कामही फार वेगवान गतीने सुरू करण्यात आले होते आता ते काम पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे.
मराठवाडा विभागामध्ये अनेक धार्मिक व पर्यटन स्थळ असल्यामुळे येथे बाहेरून येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये असलेले पर्यटन स्थळ वेरूळ, अजिंठा, दौलताबाद, घृष्णेश्वर व बीबी का मकबरा हे बघण्यासाठी बाहेरून मोठ्या प्रमाणात लोकसंख्या येथे जमते. नवीन वंदे भारत एक्सप्रेस चालू झाल्यानंतर मराठवाडा विभागाला पर्यटन स्थळांमध्ये अधिकच फायदा होणार आहे. ही रेल्वे चालू झाल्यानंतर मराठवाड्याला पर्यटन, व्यावसायिक, कृषी, शैक्षणिक व विकासाच्या दृष्टीने मोठा फायदा होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय बनावटीची रेल्वे आहे व ही रेल्वे तिच्या वेगासाठी ओळखली जाते.
वंदे भारत एक्सप्रेस कधी सुरू होणार:
वंदे भारत एक्सप्रेस साठी चालू असलेल्या रेल्वे महामार्गावरील सर्व कामे जसे की विद्युतीकरण, सिग्नल यंत्रणा, रेल्वे मार्गाचे मजबुतीकरण इत्यादी कामे जवळपास पूर्ण झाले आहेत हे काम पूर्ण झाल्यामुळे वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
या मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस:
येणाऱ्या ३० डिसेंबर २०२३ रोजी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पाच नवीन वंदे भारत एक्सप्रेस ला श्री. नरेंद्र मोदी हिरवा कंदील दाखवणार आहेत अशी माहिती समोर आली आहे.
या आहेत पाच नवीन वंदे भारत एक्सप्रेस व त्यांचे मार्ग:
२) नवी दिल्ली ते वैष्णवी देवी
३) अमृतसर ते नवी दिल्ली
४) कोईम्बतूर ते बेंगलोर
५) जालना ते मुंबई
असे असणार आहे जालना मुंबई वंदे भारत चे वेळापत्रक:
मराठवाड्यामध्ये जालना ते मुंबई या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस ही या वेळामध्ये धावणार आहे;जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ०५:३० वाजेच्या सुमारास जालना येथून निघणार आहे ही एक्सप्रेस सकाळी मुंबई येथे ११:०० वाजेच्या दरम्यान पोहोचणार आहे.
वंदे भारत एक्सप्रेस ही मुंबईवरून दुपारी ०१:३० वाजता निघणार आहे व सायंकाळी ०७:३० वाजेच्या दरम्यान ही रेल्वे जालना येथे पोहोचणार आहे अशी माहिती समोर आली आहे.
वंदे भारत एक्सप्रेस या ठिकाणी थांबणार:
नवीन चालू होणारी वंदे भारत एक्सप्रेस ही सकाळी जालना वरून निघून छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक इगतपुरी, ठाणे व अंतिम टप्पा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई या ठिकाणी थांबणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अश्या प्रकारे असणार आहे तिकिटाचा दर:
जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस चा तिकिटाचा दर हा १००० रुपये ते १२०० रुपये या दरम्यान असू शकतो अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे परंतु अद्याप हा दर पूर्णपणे ठरलेला नाही.मराठवाड्यातील प्रवाशांसाठी या आधी मुंबईला प्रवास करण्यासाठी रेल्वे उपलब्ध होत्या परंतु त्या रेल्वेचे वेळापत्रक सोयीचे नसून प्रवाशांसाठी ते फार अडचणीचे ठरत होते. याआधी मुंबई जाण्यासाठी प्रवाशांना खूप वेळ लागत होता अशाही अडचणी रेल्वेने प्रवास करणारे नागरिकांनी सांगितले आहे. वंदे भारत एक्सप्रेस ला मान्यता मिळताच मराठवाड्यातील रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे.
0 Comments