"पीएम" किसान व "नमो" सन्मान या योजने पासून 93 हजार लाभार्थी वंचित

"पीएम" किसान व "नमो" सन्मान या योजने पासून 93 हजार लाभार्थी वंचित


पीएम किसान व नमो या योजने पासून 93 हजार लाभार्थी वंचित!

महाराष्ट्र राज्यातील 93 हजार शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना (PM KISAN) या योजने मधून मिळणार असणाऱ्या १५ व्या हफ्त्यापासून वंचित राहावे लागले आहे. शेतकऱ्याने आधार कार्ड सोबत बँक खाते लिंक न केल्यामुळे राज्यामध्ये हा मोठा गोंधळ निर्माण झाला आहे तसेच याच शेतकऱ्याला महाराष्ट्र राज्यातील नवीन चालू झालेली नमो शेतकरी महा सन्मान योजनाचाही लाभ मिळाला नाही. या 93 हजार शेतकऱ्यांना दोन्ही योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आता सरकारी यंत्रणेची धावपळ सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांना नमोचाही पहिला हप्ता मिळाला नाही. राज्यात चालू असलेल्या नमो सन्मान योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी राज्य सरकारकडून नियोजन सुरू आहे. त्यांनी शेतकऱ्यांची माहिती राज्य सरकारकडून मागून घेतली आहे. नमो सन्मानचा  दुसरा हप्ता डिसेंबर शेवटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

सरकारने आधार कार्ड लिंक असलेल्या खात्यातच पैसे पाठवले जातील अशी सूचना दिली होती परंतु ही अट चौदाव्या हप्त्याच्या वेळी थांबवण्यात आली व त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील ८५ लाख ६०००० शेतकऱ्यांना १४ वा हप्ता मिळाला. पण त्यानंतर पंधरावे हप्त्यासाठी केंद्र सरकारने आधार कार्ड आपल्या खात्याशी लिंक करून घ्यावे अशा सूचना दिल्या आहेत व त्यानंतरच हप्ता टाकल्या जाईल अशी माहिती दिली आहे.

वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड आपल्या खात्याशी लिंक होताच त्यांना योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशी अट शासनाने घातली आहे.

राज्यातील महसूल विभागाकडे आधी पीएम किसान योजनेची जबाबदारी होती पण त्यानंतर शेतकऱ्यांच्या भूमी अभिलेखेच्या नोंदणी शेतकऱ्यांच्या बँक खात्याशी आधार असलेले अकाउंट व शेतकऱ्यांची केवायसी करून घ्यावे अशा तीन सूचना सरकारने महसूल विभागाला दिले आहेत. तसेच सूत्रांच्या माहितीनुसार पीएम किसान व नमो किसान योजनेची जबाबदारी कृषी विभागाकडे देण्यात आलेली आहे. तेरा लाख शेतकऱ्यांनी आधार कार्ड व केवायसी पूर्ण केल्याने ७० लाख वरून थेट ८४ लाख ५० हजारांच्या वर लाभार्थीची संख्या वाढली गेली आहे. कृषी विभागाने आणि शेतकऱ्यांनी या अटी पूर्ण केल्याने लाख शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे व त्यांची केवायसी पूर्ण झालेली आहे.

केवायसी व आधार कार्ड खातेशी लिंक केल्यानंतर तेरावा हप्ता त्यानंतर शेतकऱ्यांना जवळपास १६५० कोटी रुपये तेराव्या हप्त्या अखेर मिळाले. महाराष्ट्र शासन व केंद्र द्वारे चालू असलेल्या या पी एम किसान योजना व नमो सन्मान योजना त्यांनी लाभ घेण्यासाठी आपले केवायसी आधार कार्ड खातेशी लिंक करून घ्यावे व आपल्या बँकेत जाऊन भेट द्यावी. आत्ता हफ्ता न  मिळाल्या शेतकऱ्यांना केवायसी व आधार कार्ड लिंकिंग नंतर हप्ता मिळणार आहे याची सूत्राद्वारे माहिती मिळाली आहे. शेतकऱ्यांनी कुठलेही संभ्रमामध्ये न राहता डिसेंबरच्या अखेरीस पडणाऱ्या नमो किसान योजनेची वाट बघावी.

केवायसी व आधार लिंक करण्यासाठी जाताना आपले बँकेचे पासबुक, आधार व पॅन कार्ड व इतर कागदपत्रे सोबत घेऊन जावेत.

महत्त्वाचे मुद्दे:-

१) नमो किसान व पीएम किसान शेतकरी लाभार्थी वाढवण्यासाठी शासकीय यंत्राची धावपळ सुरू

२) महाराष्ट्र मुख्यमंत्री द्वारा चालू करण्यात आलेल्या नमोचा दुसरा हप्ता देण्याचे राज्य शासनाचे नियोजन सुरू डिसेंबरच्या शेवटी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता

३) राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या यंत्रणेने उत्तम कामगिरी केल्याने १४ लाख शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झाली

४) येणाऱ्या पुढील हप्त्यासाठी बँक खात्याशी आधार लिंक करण्याचे आवाहन शासन केले आहे

के वाय सी व आधार लिंक केलेल्या शेतकऱ्यांना पी एम किसान योजना व नमो सन्मान योजना या दोन्हीही योजनेचा लाभ लवकरात लवकर मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments