राज्यातील अवकाळी पावसाने कापूस भिजला: शेतकऱ्यावर आले संकट! बघा काय केले पाहिजे

राज्यातील अवकाळी पावसाने कापूस भिजला: शेतकऱ्यावर आले संकट! बघा काय केले पाहिजे



४ व ५ डिसेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसाने राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी त्रस्त झालेला असून शेतकऱ्यावर मोठे संकट आल्याचे दिसून येत आहे. राज्यातील अवकाळी पावसाने शेतातील कापूस पूर्ण भिजला असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. तोंडाशी आलेला घास शेतकऱ्याच्या हातातून निघून जात आहे. राज्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शेतातील संपूर्ण कापूस भिजलेला असून शेतकऱ्यांनी जमा केलेला कापूस व्यापारी विकत घेत नसल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. परिस्थितीमध्ये कापूस या पिकाचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांना भिजलेल्या कापसाचे काय करावे हे सूचनाशे झाली आहे. वेचणीला आलेला कापूस हंगामात पावसाने भिजल्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये खूप ढगाळ वातावरण असल्याने अंतिम टप्प्यात गुलाबीबोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे. सध्याची हे ढगाळ आभाळ बघून शेतकऱ्यांसाठी नुकसानीचे चिन्ह समोर दिसत आहे.

आत्ताच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी अधिकच्या उत्पादनासाठी हाताशी आलेली वेचणी न डावलता याच वेळेत वेचणी चे काम लवकर केले पाहिजे व आत्ताच वेचणी केली तर शेतकऱ्यांच्या पदरी कापूस पडणार आहे.

परभणी येथे असलेल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. येथील ग्रामीण शेती हवामान सेवा योजनेतील तज्ञ समितीने व अधिकाऱ्यांनी भिजलेल्या कापसाचे व बोंडआळी पडलेल्या कापसावर याचे नियोजन कसे करावे हे थोडक्यात सांगितले आहे.

शेतकर्यांनी घ्यावयाची काळजी:-

१) सध्या शेतामध्ये वेचणी साठी आलेल्या कापूस हा लवकरात लवकर वेचून एका सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावे जेणेकरून त्याला पाणी लागू नये व कपाशीची नुकसान होऊ नये.

२) जी कपाशी पावसाने भिजली आहे त्याची वेचणी कापूस वाळल्यानंतर करावी व तो कापूस वेगळ्या ठिकाणी साठवून ठेवावा

३) आत्ताच झालेल्या अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकात बोंड अळी दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सिक्‍लोराईड २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यामध्ये मिसळून पावसाची उघड झाल्यानंतर फवारणी करावी

४) जर कापूस पिकात गुलाबी बोंड आळी दिसून येत असेल तर त्या बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी थायमिथॉक्झाम 12.6% + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5% 6 मिली किंवा सायपरमेथ्रीन 25 ईसी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून फवारणी करावी. 

५) शेतकऱ्यांनी आधी वेचनी केलेला कापूस व पावसात भिजलेला कापूस याचे व्यवस्थापन वेगळे वेगळे करावे जेणेकरून पांढरेशुभ्र कापूस वरती ओला झालेला कापसाचा परिणाम होऊ नये.

६) शेतकऱ्यांनी भिजलेल्या कापसाची वेचणी कापूस वाळल्यानंतरच करावी अन्यथा कापसाचे पूर्णपणे नुकसान होईल.

७) भिजलेला कापूस व वाळलेला कापूस एकत्रित करू नये अन्यथा कापसाच्या किमतीमध्ये मोठी घसरण होईल.

८) कापूस साठवलेल्या जागेमध्ये पाणी गळाले नाही पाहिजे याची काळजी घ्यावी.

९) कापूस जेवढा स्वच्छ व वाळलेला असेल तेवढा चांगला प्रतिक्विंटल दर मिळतो.

१०) शेतकऱ्यांनी कापूस घरामध्ये साठवल्यानंतर पाणी फवारू नये.

वरील सर्व बाबी शेतकऱ्याने लक्ष्यात ठेवावे.

अखेर इंडिया आघाडीच्या बैठकीचा मुहूर्त ठरला: १७ डिसेंबर रोजी होणार बैठक

 परभणी जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५ डिसेंबर (मंगळवार) रोजी कापसाला किमान ६७९० तर ७२३० कमाल प्रतिक्विंटल मिळाला. पावसाचे वातावरण असल्यामुळे शेतातील वेचणीस राहिलेला कापूस हा भिजला असून त्या कापसात मधील धागेची क्षमता ही खराब झाली असून परिणामी मोठ्या प्रमाणात कापसाच्या भावांमध्ये घसरण झाली आहे. तसेच परभणी जिल्ह्यातील मानवत मध्ये कापसाला प्रतिक्विंटल ६२०० ते ७३१० असा भाव मिळाला.

मागील काही आठवड्यामध्ये कापसाचे असे काही भाव होते:-

ता. ३० नोव्हेंबर:- कापूस प्रतिक्विंटल किमान ७११० ते कमाल ७२९० रुपये.

ता. १ डिसेंबर:- कापूस प्रतिक्विंटल किमान ७०५० ते कमाल ७२६० रुपये तर सरासरी ७२०० रुपये.

ता. २ डिसेंबर:- कापूस प्रतिक्विंटल किमान ७२२५ ते कमाल ७३१० रुपये तर सरासरी ७२७५ रुपये दर मिळाले.

ता. ४ डिसेंबर:- कापूस प्रतिक्विंटल किमान ६२०० ते कमाल ७२७० रुपये तर सरासरी ७२००रुपये दर मिळाले.

ता. ५ डिसेंबर (मानवत बाजार समिती):- कापूस प्रतिक्विंटल किमान ७०५० ते कमाल ७१८० रुपये तर सरासरी ७१३० रुपये दर मिळाले. तर भिजलेल्या पावसाला किमान ६००० ते कमाल ६४०० रुपये दर मिळाले.

Post a Comment

0 Comments