नागपुर हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस गाजणार: नवाब मलिकांवरून रंगणार आरोप प्रत्यारोप

नागपुर हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस गाजणार: नवाब मलिकांवरून रंगणार आरोप प्रत्यारोप

  
 
    चालू असलेल्या अधिवेशनामध्ये नवाब मलिकांवरून सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये चांगली चर्चा रंगणार आहे      त्यामुळे आजचा दिवस नक्की गाजणार

महाराष्ट्र हिवाळी अधिवेशन दिवस दुसरा: नागपूर येथे चालू असलेल्या अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक हे सत्ताधाऱ्यांच्या बाजूने जाऊन बसल्याने भारतीय जनता पार्टीची चांगलीच तारांबळ उडालेली आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसताच विरोधी नेत्यांनी या चर्चेला उधाण आणले आहे. भारतीय जनता पार्टीला आता नवाब मलिक कसे चालतात असा प्रश्न निर्माण होताच सभाग्रहात ठिणगी पडली आहे. पहिल्या दिवशी विरोधी पक्षातील नेत्यांना निर्माण झालेला हा प्रश्न आज मोठ्या प्रमाणात चर्चेत येण्याचा दिसून येत आहे. नवाब मलिक यांना सत्तेमध्ये सामील करू नये याचे पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार गटाचे नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित अनंतराव पवार यांना दिले आहे. दिलेल्या पत्राद्वारे अनेक तर्क वितर्क लावले जात आहे.

तसेच या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्यामध्ये चालू असलेले मराठा आरक्षणावर चांगली चर्चा होऊ शकते असेही सांगितले आहे. राज्यामध्ये झालेल्या मागील काही दिवसांमध्ये ड्रग्स वरील कारवाई, ड्रग्स कारखाने, आरोग्य विभागातील घोटाळे व अवकाळी पावसामुळे झालेली शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान अशा सर्व विषयांवर आज चर्चा होण्याची दाट शक्यता आहे या मुद्द्यांवरून विरोधकानी सत्ताधार्याना चांगलंच परेशान करणार असून केलेल्या कारवाया व झालेल्या नुकसानाबाबत दाद मागणार आहेत. ड्रग्स प्रकरणी अटक असलेला ललित पाटील यांचा महाराष्ट्र राज्याचे मंत्री दादा भुसे यांच्याशी काही संबंध आहे का याचाही तपास करा अशी मागणी होणार आहे.

नवाब मलिक सत्तेत सामील: देवेंद्र फडणवीस यांनी अजित दादांना दिले पत्र

नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिलाच दिवशी चांगलाच रंगला तो म्हणजे फक्त एका व्यक्तीमुळे ते म्हणजे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक. ऑगस्ट २०२३ मध्ये नवा मलिक हे जामीनावर जेलमधून बाहेर आले आहे. नवाब मलिकांची जेल मधून सुटका झाल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फुटी नंतर त्यांची काय भूमिका आहे हे आतापर्यंत भ्रमात होतं काल नवाब मलिक अचानक अधिवेशनात हजर झाले व सत्ताधाऱ्यांच्या बाकावर जाऊन बसले यामधून नवाब मलिक यांचा अजित दादा पवार यांच्या गटाला समर्थन आहे असे दिसून आले आहे हे सर्व झाल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच पट्ट्यावर घेतले व या सर्व गोष्टी घडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहिले.

हेही वाचा: राज्यातील अवकाळी पावसाने कापूस भिजला: शेतकऱ्यावर आले संकट! बघा काय केले पाहिजे

काय लिहिले आहे पत्रामध्ये

सध्या जामीनावर सुटलेले माजी मंत्री नवाब मलिक हे अजित पवार गटांमध्ये सामील होऊन सत्ताधारी बाकांवर बसले आहे. यामुळे भारतीय जनता पार्टी वर टीकेचे शस्त्र उठत असल्याने उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र मार्फत विरोध केला आहे. दवेंद्र फडणवीस असे म्हंटले आहे की सत्ता येते जाते पण देश महत्त्वाचा आहे व नवाब मलिक यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली आहे.

नवाब मलिक यांच्यावर लागलेला हा आरोप खूप मोठा आहे त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये सहभागी करून घेऊ नये असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रामार्फत अजित पवारांना सांगितले आहे. यामध्ये असेही दिसून येते की सत्ताधाऱ्यांमध्ये समाविष्ट झालेले अजित पवार गटाचे नेते व भारतीय जनता पार्टीचे नेते यांच्यामध्ये मतभेद असल्याचे समोर दिसून येत आहे.

हेही वाचा: अखेर इंडिया आघाडीच्या बैठकीचा मुहूर्त ठरला: १७ डिसेंबर रोजी होणार बैठक

नागपूर येथे काल चालू झालेले हिवाळी अधिवेशनाला पहिल्याच दिवशी अशा प्रकारची चर्चा रंगल्याने आज दुसरा दिवसही चांगलाच रंगणार आहे असे दिसून येत आहे.

माजी खासदार विजय दर्डा यांच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत सर्व आमदारांसाठी जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला जामीनावर सुटलेले नवाब मलिक यांनीही उपस्थिती लावली व नवाब मलिक तेथून गेल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय दर्डा यांच्या दिलेल्या जेवणाचा निमंत्रणासाठी माजी खासदार विजय दर्डा यांच्या घरी दाखल झाले होते.

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवाब मलिकांची एन्ट्री झाल्याने अनेकांनी टीका केल्या. नवाब मलिकांना तुम्ही अजित दादा यांचा गटामध्ये सामील झाला आहात का असा प्रश्न विचारतात नवाब मलिकांनी मी कोणतेही गटात नसून मी सध्या राष्ट्रवादी चा कार्यकर्ता आहे असे त्यांनी सांगितले पण नवाब मलिक यांनी सत्ता बाकावर जाऊन थोडक्यात अशी ही संकेत दिली आहे कि ते अजित दादा गटाला समर्थन देत आहे.

या सर्व घटना घडल्यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते असे म्हटले आहे की देशद्रोहाचे आरोप असलेल्यांच्या मांडीला मांडी लावून आता देवेंद्र फडणवीस बसणार का असा त्यांनी सवाल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना आता नवाब मलिक चालणार आहेत का?

ही संपूर्ण घटना घडल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या पत्राद्वारे अजित पवारांना असे सांगितले आहे की नवा मालिकांचा सत्तेमध्ये प्रवेश करून घेऊ नये. दिलेल्या पत्रानंतर रात्री अजित दादा पवार यांच्या गटामध्ये राजकीय पडसाद दिसून आले आहे. राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाचे वरिष्ठ नेते मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

"उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित दादा यांना पत्र दिले नसते तर बर झाले असते"

 - दिलीप वळसे पाटील

तसेच, अजित दादा पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

"नवाब मलिक हे या विधान भवनाचे सदस्य आहेत नवाब मलिक यांना कुठे बसायचे आहे कुठे नाही हे अधिकार मला नाही हे पूर्ण अधिकार अध्यक्ष महोदयांना आहे".

 - अजीत अनंतराव पवार (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य)

यावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही आपली प्रतिक्रिया सांगितले आहे

"देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या पत्रानंतर असे दिसून येत आहे की भारतीय जनता पार्टी ही सत्तेसाठी कुठल्याही थराला जाऊ शकते देवेंद्र फडणवीस यांनी हे पत्र अजित पवारांना खाजगीतही दिले असते तर ते शक्य झाले असते त्यांना ते पत्र जाहीर करायची गरज नव्हती"

 - आमदार बाळासाहेब थोरात

विधानभवनाच्या परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला मराठा आरक्षणासंदर्भात बॅनरबाजी केली आहे. ही बॅनरबाजी मराठा युवा सेना महाराष्ट्र राज्य यांनी केली आहे. लावलेल्या बॅनर द्वारे मराठा आरक्षणाबाबत काही प्रश्न विचारले आहे व तसेच विधान भवन परिसरातील काही बॅनर काढले आहेत व काही बॅनर जसेच्या तसे आहेत. चालू असलेल्या अधिवेशनात मराठा आरक्षणावर तातडीने चर्चा व्हावी अशी मराठा युवा सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेची मागणी आहे.

Post a Comment

0 Comments