टी२० मालिकेमध्ये भारताची दमदार कामगिरी: ऑस्ट्रेलिया संघाचे झाले हाल

टी२० मालिकेमध्ये भारताची दमदार कामगिरी: ऑस्ट्रेलिया संघाचे झाले हाल

 

०३ डिसेंबर २०२३ रोजी बेंगलोर येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या मधील शेवटचा सामना पार पडला. सामन्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला सहा धावांनी हरवले असून या मालिकेतील ४-१ अशी संपूर्ण मालिका भारताने जिंकून दाखवली. या मालिकेची संपूर्ण जबाबदारी कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवने सांभाळली होती.

टी२० सामन्यात मध्ये रोमांचक विजय मिळवून देण्याचे श्रेय म्हणजे अर्शदीप सिंह होय असेही म्हणता येईल. या सामन्यामध्ये अक्षर पटेल ने ०१, मुकेश कुमार ०३, तर हर्षदीप सिंग, रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी ०२ विकेट घेतल्या तसेच फलंदाजी मध्ये श्रेयश अय्यर यांनीही दमदार ५३ रणाची व अक्षर पटेल ने ३१ रणाची पारी खेळली.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या टीम मध्ये खेळायला गेलेल्या मालिकेमध्ये भारताने चार व ऑस्ट्रेलिया संघाने एक मॅच जिंकला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या मालिकेमधील पहिले दोन सामने भारताने २ विकेट्स व ४४ रन असे  जिंकले असून तिसऱ्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाने दमदार पुनरागमन करत ५ विकेट ने सामना जिंकला होता.

त्यानंतर रायपूर येथे झालेल्या ४ सामन्यांमध्ये भारताने पुनरागमन करत २० धावांनी सामना जिंकला.

शेवटच्या टी ट्वेन्टी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन अशी होती

भारत:- ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, श्रेयश अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा, अक्षर पटेल रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, हर्षदीप सिंग

ऑस्ट्रेलिया:- ट्रेविस हेड, जोश फिलिप, बेन मॅकडर्मॉट, ऍरॉन हार्डी, टीम डेविड, मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक/कर्णधार), बेन ड्वार्शुइस, नेथन एलिस, जेसन बेहरेन्डॉर्फ, तन्वीर संघा

या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच अक्षर पटेल ठरला असून या मालिकेतील मॅन ऑफ द सिरीज रवी बिश्नोई ठरला आहे या विजाया नंतर कर्णधार सूर्यकुमार यादव खूप खुश झाला आहे. जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवने त्याची प्रतिक्रिया सांगितली आहे की,

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही मालिका आमच्यासाठी खूप खास होती या मालिकेमध्ये ज्या प्रकारे खेळाडूंनी विश्वास दाखवला क्षमता दाखवली ती कौतुकास्पद आहे. आम्हाला निर्भीड राहायचे होते आम्हाला कुणावरही डिपेंड राहायचे नव्हते जेव्हा आम्ही खेळत होतो तेव्हा आम्हाला फक्त या सामन्याचा आनंद घ्यायचा होता मी सर्व खेळाडूंना सांगायचो की जे योग्य आहे ते करा, हवं तस खेळा आणि आपल्या खेळाचा आनंद घ्या पूर्ण जिद्दीने मालिका जिंकून दाखवा त्यांनीही तसेच केल्याने आम्हीही मालिका जिंकू शकलो व यामुळे मी खूप खुश आहे अशी प्रतिक्रिया सूर्यकुमार या दोन्ही दिली आहे.

त्यानंतर सूर्यकुमार यादवने वॉशिंग्टन सुंदर याबद्दलही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की वॉशिंग्टन सुंदर हा असता तर आमच्यासाठी हा एक खूप मोठा प्लस पॉईंट ठरला असता बंगलोर येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर २०० होऊन अधिक धावांचा पाठलाग करणे सोपे नाही १५० ते १७५ रन्स येथील कठीण आव्हान सांगितले गेले आहे दहा ओव्हर नंतरही मी खेळाडूंना म्हटलं की आपण सामना अजूनही जिंकू शकतो व त्यानंतर तसेच झाले.

आजून वाचा: राहुल द्रविड चा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ वाढला बघा काय म्हटले सौरभ गांगुली


सामना जिंकण्यामध्ये अर्शदिप सिंग यांचा मोलाचा वाटा:-

सामना जिंकल्यानंतर अश्वदीपसिंग ने ही प्रतिक्रिया दिली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया शेवटचा सामन्यामध्ये मी आधीच्या तीन ओव्हर मध्ये खूप जास्त धावा दिल्या आहेत. नंतरही चौथ्या ओव्हर मध्ये माझ्यावर विश्वास दाखवून कर्णधार सूर्यकुमार यादव ने मला चौथी ओव्हर टाकण्यास सांगितले व म्हटलं की जे होईल ते होईल.... आणि याचे श्रेय फलंदाज व कर्णधार सूर्यकुमार यादव यांना जाते माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी पूर्ण स्टाफचेही धन्यवाद म्हणेल..

हर्षदीप सिंग या मालिकेमधील त्याच्या प्रदर्शनावर जास्त काही खुश दिसला नाही. तो म्हणाला की ज्या प्रकारची लेव्हल आम्ही सर्व भारतीय टीम मध्ये तयार केली होती त्या प्रकारचे प्रदर्शन आम्हाला दिसले नाही व त्यांनी असे म्हटले आहे की या सामन्यामधून त्याच्याकडे शिकण्यासाठी भरपूर काही मिळाले आहे व तो पुन्हा टीम इंडिया साठी चांगले पुनरागमन करेल..

ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.टीम इंडियाचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि रुतुराज गायकवाड यांनी प्रथम जाऊन भारताच्या डावाला सुरुवात केली तर वेगवान गोलंदाज आरोन हार्डी आणि जेसन बेहरेनडॉर्फ ऑस्ट्रेलियाच्या वेगवान आक्रमणाचे नेतृत्व केले होते.

पूर्ण सामना विषयी काही सांगायचे झाले तर भारताने टॉस गमवत प्रथम फलंदाजी केली यावेळी भारताच्या श्रेयश अय्यर च्या अर्धशतकाच्या जोरावर निर्धारीत २० ओव्हर मध्ये ८ विकेट गमवत १६० रन्स बनवले.

तसंच अक्षर पटेल ने सातव्या क्रमांकावर बॅटिंग करत ३१ धावांची योगदान भारतासाठी दिले आहे.

भारताचे आव्हान पार करण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाला २० ओव्हर मध्ये ८ विकेट गमवत १५४ रन करता आले त्यामुळे भारताने हा सामना ६ रण ने जिंकला. व पूर्ण मालिका ४-१ ने जिंकून दाखवली.

Post a Comment

0 Comments