दिग्गज नेत्यांना हरवले काँग्रेसने मारली बाजी: रवंत रेड्डींचा ७ डिसेंबरला होणार शपथविधी

दिग्गज नेत्यांना हरवले काँग्रेसने मारली बाजी: रवंत रेड्डींचा ७ डिसेंबरला होणार शपथविधी




आत्ताच पार पडलेल्या चार राज्यातील निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. तेलंगणा राज्यामध्ये काँग्रेसची एक हाती सत्ता येऊन संपूर्ण तेलंगणा हे काँग्रेसमय झालं आहे. तेलंगणामध्ये या काँग्रेसच्या विजयानंतर तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार या सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला असून तो प्रश्न आता सुटला आहे. राज्यांमध्ये सर्वाधिक जागा काँग्रेसने निवडून आणल्याने काँग्रेसचे दिग्गज नेते रवंत रेड्डी यांची तेलंगणाच्या नव्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार आहे. दिग्गज नेत्यांच्या चर्चेनंतर रवंत रेडी यांचे नाव निश्चित केलं असून येत्या ०७ डिसेंबर २०२३ रोजी रवंत रेड्डी हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

रवंत रेड्डी हे तेलंगणा राज्याच्या विजयाचे महत्त्वाचे शिल्पकार ठरले आहेत परंतु यांच्या नावाला सुरुवातीला काँग्रेस मधील काही नेत्यांनी विरोध केला पण हा विरोध काँग्रेसच्या हायकमांड ने फेटाळून रवांत रेड्डी यांचे मुख्यमंत्री पदी नाव शिकामोर्तब केले आहे.

हैदराबाद मध्ये झालेल्या मीटिंगमध्ये सीपीएलच्या बैठकीत सर्व नेत्यांच्या एकमताने हा निर्णय घेण्यात आला असून तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी काँग्रेस पक्षाने रवंत रेड्डी यांचे नाव फिक्स केले आहे. असे सांगितले जाते की काँग्रेसचे दिग्गज नेते श्री राहुल गांधी यांचीही पसंती रवंत रेड्डी यांना होती.

काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी व काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्यामध्ये एक बैठक घेण्यात आली होती त्यावेळी रवंत रेडी यांचे नाव अंतिम करण्यात आलं. तेलंगणा मधील काँग्रेस विजयाचे शिल्पकार श्री रवंत रेडी यांना त्यांच्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचा विरोधाचा सामना करावा लागला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर अशी माहिती मिळाली आहे की तेलंगणा काँग्रेस प्रदेशच्या ज्येष्ठ नेत्यांच्या विरोधानंतर सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्री पदाचा शपथविधीही रद्द करावा लागला असल्याची चर्चा झाली आहे.

काँग्रेसमय तेलंगणा:
तेलंगणा राज्यामध्ये ११९ विधानसभा मतदारसंघ आहेत. ११९ जागांपैकी काँग्रेसने ६४ जागांवर विजय मिळवला आहे. भारत राष्ट्र समितीने ३९ जागांवर विजय मिळवला आहे तर भारतीय जनता पार्टीने फक्त ०९ जागांवर विजय मिळवला आहे. तेलंगणा राज्यामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी कुठल्याही पक्षाला अवघ्या ६० जागांची गरज होती परंतु काँग्रेसने पक्षाने ६४ जागा मिळवून एक हाती सत्ता स्थापन करण्याचे धोरण आखले आहे.

रवंत रेड्डी हे कोंडगल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. कोंडगल विधानसभा मतदारसंघातून भारत राष्ट्र समिती (बीआरएस) चे ज्येष्ठ नेते पी नरेंद्र रेड्डी यांचा रवंत रेड्डी यांनी तब्बल ३२००० हजार पेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे. तेलंगणा मधील निवडणुकीचे सर्व निकाल जाहीर होतात काँग्रेसचे नेते रवंत रेड्डी यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी प्रथम क्रमांकावर होते अशी माहिती समोर आली आहे. कोंडगल मतदारसंघाचे रवंत रेड्डी हे  मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा पूर्णपणे योग्य आहे असे समजल्यावर कोंडगल मतदारसंघातील प्रत्येक घराघरात त्यांच्या नावाची चर्चा व त्यांची स्तुती होत आहे.

काँग्रेसच्या हायकमांडच्या आदेशानुसार २०२१ मध्ये रवंत रेड्डी यांना तेलंगणा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष या पदाची जबाबदारी देण्यात आली होती.

रवंत रेड्डी यांना विरोध केलेल्या काँग्रेस नेत्यांची नावे बाहेर आली आहे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष एन उत्तम कुमार रेड्डी, माजी मंत्री कोमतीरेड्डी व्यंकट रेड्डी व माजी उपमुख्यमंत्री दामोदर राजनसिंह व सीएलपी नेते भट्टी विक्रमार्क यांचे नाव समोर आले आहे या सर्व नेत्यांनी रवंत रेड्डी यांना विरोध केला होता असल्याची माहिती समोर आली आहे.

वरील नेत्यांनी काँग्रेस हायकमांड ला अशी माहिती दिली होती की रवंत रेडी यांनी केलेला भ्रष्टाचाराची प्रलंबित प्रकरणे व रवंत रेडी यांच्या लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या खराब कामगिरी व जनतेमधील रोष असल्याचे सांगितले होते.

तेलंगणा राज्यामध्ये खालील प्रकारे निकाल लागले आहे

काँग्रेस:- ६४

भारत राष्ट्र समिती:- ३९ 

भारतीय जनता पार्टी:- ०८

एआयएमआयएम:- ०७

इतर:- ०१

रवंत रेड्डी हे काँग्रेस पक्षाकडून खासदार व दोन वेळा आमदार राहिलेले आहेत व त्यांनी तेलगू दसम पार्टी या पक्षासाठी ही जबाबदारी पार पाडली होती. रवंत रेड्डी हे उस्मानिया विद्यापीठाचे कला शाखेचे पदवीधर आहे. रवंत रेड्डी यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते जयपाल रेडी यांची भाची गीता सोबत लग्न केले व या जोडप्याला एक मुलगी आहे अशी त्यांची पार्श्वभूमी आहे.

कोंडगल मतदार संघामध्ये रवंत रेड्डी यांचा दमदार वर्चस्व असून कोंडगल मतदार संघातून त्यांना जनतेने तब्बल ३२००० हजार मताधिक्याने देऊन निवडून आणले आहे.

Post a Comment

0 Comments