राज्यसरकारने दिले आदेश: सरसकट ३४ रुपये भाव न देणाऱ्या संघांवर कारवाई करा पशुखाद्य महागले

राज्यसरकारने दिले आदेश: दुधाला सरसकट ३४ रुपये भाव न देणाऱ्या संघांवर कारवाई करा पशुखाद्य महागले



राज्यामध्ये सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांवर संकटाचे सावट आलेल दिसून येत आहे. राज्य सरकारने दुधाला सरासरी ३४ रुपये भाव देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केली होती परंतु खाजगी व सहकारी दूध संघांनी अजूनही या शासन निर्णयाचं पालन केलेले नसून मनमानी कारभार चालू केला आहे व दुधाचे दर मुद्दाम जाणीवपूर्वक कमी केले आहेत. यामुळे दूध उत्पादक शेतकरी फार व्याकुळ झाले आहेत व यामध्ये त्यांचे नुकसान होत आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्याच्या शिष्टमंडळाने प्रांतधिकारी कार्यलय समोर आंदोलन करून घोषणा दिल्या व खाजगी व सहकारी दूध संघ चालकाचा जाहीर निषेध केला.

काल मंगळवारी (दिनांक १२) रोजी प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे यांना निवेदन देऊन शासनाच्या दिलेल्या दराचा निर्णयाची अंमलबजावणी दूध संघाने करण्याबाबत आदेश द्यावेत अशी मागणी यावेळी दूध उत्पादक शेतकर्यानी केली.

निवेदनात दूध उत्पादक शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की दूध संघाचे प्रतिनिधी असलेल्या समितीने दुधाला ३४ रुपये भाव देण्याची शिफारस शासनाने स्वीकारून अंमलबजावणी राज्यात सुरू केली होती काही दिवस होताच दूध संघ चालक व शासकीय दूध संघाचे संचालक यांनी आंतरराष्ट्रीय बाजारभावाचे कारण सांगून दुधाचे भाव मनमानी कारभार करून कमी केले व शेतकऱ्यांना फक्त २५ ते २८ रुपये या दरम्यान त्याचे भाव देण्यात येत आहे हे सर्व बघून दुध उत्पादक शेतकरी अत्यंत तीव्रपणे वेदना सहन करत आहे.

राज्यातील सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे असे सांगून शेतकऱ्यांना खोटे आश्वासन दिले जात आहे का? असा दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रश्न उद्भवला आहे.

दर कमी झाल्यापासून शेतकरी संकटात पडला आहे तरी एकीकडे मात्र जनावरासाठी लागणाऱ्या पेंड व चाऱ्याचे भाव वाढल्याने शेतकरी त्यातही त्रस्त झाला आहे शासनाने तात्काळ दुधाचे दर वाढवून द्यावेत अशी मागणी शेतकऱ्याकडून आता होत आहे.

चालू असलेल्या आर्थिक संकटात शेतकऱ्यावर दरवर्षीच संकटाचे सावट चालूच असते कधी ओला दुष्काळ तर कधी कोरोडा दुष्काळ असतो. त्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाचा व्यवसाय करून पाहिजे तेवढा नफा मिळत नाहीये असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दूध व्यवसाय करत असतात याच दूध व्यवसायाला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी दुहेरी संकटांमध्ये अडकला आहे. चांगले दूध हवे असेल तर जनावरांनाही चांगले प्रोटीन युक्त आहार द्यावे लागतात दुधामधून नफा मिळत नसल्याने शेतकऱ्यांना दूध व्यवसाय घाटामध्ये येत आहे असे वाटत आहे. दूध डेरी मध्ये दुधाला २५ रुपये भाव दिल्या जात आहे. जनावरांना सांभाळणे त्यांना चांगला आहार देणे यामध्येही शेतकऱ्यांचा खूप मोठा खर्च होत आहे.

जनावरांना लागणारा चारा जसे की ऊस वाढे, पेंड भाव वाढल्याने दुधामधून नफा मिळत नाही असे शेतकरी सांगत आहे. चाराअभावी व दुधाचे भाव बघून शेतकरी आपली जनावरे कसायाला विकून टाकत आहे असे दिसून येत आहे.



पशुखाद्याचे भाव खालील प्रमाणे:

१) पेंढ: ३२०० - ३३०० रू प्रती क्विंटल

२) ऊस: ३००० - ३१०० रू प्रती टन

३) वाढे: ६०० रू प्रती शेकडा


राज्यामध्ये चालू असलेल्या मनमानी कारभारावर राज्य सरकारने तात्काळ कारवाई करावी व शेतकऱ्यांना दुधाचा चांगला भाव मिळवून द्यावा अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments