सरकारने दिली नवीन वर्षाची भेट! बघा "या" योजना वरील वाढवले व्याजदर

सरकारने दिली नवीन वर्षाची भेट! बघा "या" योजना वरील वाढवले व्याजदर

  

नमस्कार मित्रांनो चालू झालेल्या या २०२४ नवीन वर्षामध्ये केंद्र सरकारने लहान बचत योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींसाठी खूप महत्त्वाची व आनंदाची बातमी दिली आहे. या नवीन चालू झालेल्या २०२४ वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये म्हणजे जानेवारी २०२४ ते मार्च २०२४ मध्ये दोन लहान बचत योजना वर व्याजदर वाढवून दिले आहे. केंद्र सरकारने २०२४ या नवीन वर्षासाठी काही महत्त्वपूर्ण व फायद्याच्या अशा योजना राबवले आहे व महत्त्वाच्या बाबी जाहीर केले आहेत.

गुंतवणूक करणाऱ्या लहान बचत योजनाचे व्याजदर हे केंद्र सरकारने आता १० ते २० बेसिस पॉईंट्स ने वाढवून दिले आहे. वाढवून दिलेल्या योजनांमध्ये दोन महत्त्वाचे योजना आहे जसे की, समृद्धी सुकन्या योजना व ०३ वर्षाच्या पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजनेचा समावेश केंद्र सरकारने केला आहे.

केंद्र सरकारने चालू केलेल्या या योजनेचा व्याजदर आधी ०८ टक्के होता मात्र आता या नवीन वर्षामध्ये तो व्याजदर ०८.२० टक्के एवढा केला आहे. या योजनेमध्ये आपण कमीत कमी २५० रुपये ठेवू शकतो व आर्थिक वर्षात या योजनेमध्ये जास्तीत जास्त १.५० लाख रुपये ठेवण्याची केंद्र शासनाने सवलत दिली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिस बँक किंवा इतर अधिकृत बँकांमध्ये सुकन्या समृद्धी योजना खाते उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

काय आहे समृद्ध सुकन्या योजना:-

सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारची एक लहान बचत ठेव योजना आहे. केंद्र सरकारने ही योजना फक्त मुलींसाठी चालू केलेली आहे. जानेवारी २०१५ रोजी माननीय पंतप्रधानांनी ही योजना "बेटी बचाव बेटी पढाओ" या अभियाना मधून चालू केली आहे. या सुकन्या समृद्धी योजना चे मुख्य उद्दिष्ट म्हणजे मुलीच्या शिक्षणाचा व लग्नाचा खर्च भागवण्याचा हा आहे. केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना या योजनेची घोषणा १४ डिसेंबर २०१४ रोजी केली होती.

"सुकन्या समृद्धी योजना" या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे भविष्यामध्ये होणाऱ्या मुलीच्या शिक्षणावरील खर्च व तिच्या लग्नावरील खर्च या गोष्टीसाठी निधी तयार करण्यास ही योजना पालकांना प्रोत्साहित करते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जवळच्या पोस्ट बँकेमध्ये किंवा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जाऊन सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडून त्यामध्ये गुंतवणूक करू शकता.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे व काही नियम व अटी देखील आहेत.

"सुकन्या समृद्धी योजना" ही योजना फक्त दहा वर्षाखाली मुलींसाठी आहे व एका मुलीसाठी एकच खाते आहे एका कुटुंबामधून या योजनेचा लाभ फक्त दोन मुलींसाठीच होऊ शकतो. या योजनांमध्ये पालक मुलींच्या नावावर कमीत कमी २५० रुपये ते जास्तीत जास्त एक लाख ५० हजार रुपये एवढीच गुंतवणूक करण्याची सवलत आहे.

हेहि वाचा:- जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालू होणार: मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी


सुकन्या समृद्धी योजनेचे फायदे :-
  • कमीत-कमी २५० रुपये भरून खाते उघडता येते.
  • वर्षाला किमान २५० रुपये आणि कमाल १ लाख ५० हजार रुपये गुंतवणूक करता येते.
  • या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी २१ वर्षे आहेत.
  • हे खाते भारतामध्ये एका पोस्ट ऑफिस किंवा बँकेतून दुसऱ्या पोस्ट ऑफिस मध्ये किंवा बँकेमध्ये बदली करता येते.
  • मॅच्युरिटी नंतर खाते बंद न केल्यास मुदतीनंतरही जमा रकमेवर व्याज मिळत राहते.
  • मुलीचे वय १८ वर्षे झाल्यानंतर तिच्या शिक्षणासाठी ५०% रक्कम काढण्याची परवानगी आहे.
  • खाते चालू केल्यानंतर फक्त पंधरा वर्षापर्यंत पैसे भरायचे असतात.

सुकन्या समृद्धी योजनेसाठी पात्रता आणि अटी :-
  • मुलीचे वय दहा वर्षांपेक्षा कमी असावे.
  • मुलीच्या एका पालकाद्वारे मुलीच्या नावाने खाते उघडता येते.
  • या योजनेअंतर्गत प्रत्येक खातेदाराचे एकच खाते असावे.
  • एका कुटुंबातील फक्त दोनच मुलींचे खाते उघडले जाऊ शकते, परंतु जर पहिली मुलगी असेल आणि दुसऱ्या प्रसुती वेळी जुळ्या मुलींचा जन्म झाला असेल, तसेच पहिल्या प्रसूती वेळेस जर तिळ्या मुलींचा जन्म झाला असेल तर अशा परिस्थितीत त्या तीनही मुलींच्या नावे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते मुलींच्या जन्म प्रमाणपत्रासह पालकांनी प्रतिज्ञापत्र सादर केल्यास उघडता येऊ शकते.

तसेच, पोस्ट ऑफिस मुदत ठेव या योजनेवरही शासनाने व्याजदर वाढवून दिले आहे. शासनाने दिलेल्या जानेवरी २०२४ ते मार्च २०२४ या कालावधीमध्ये आपली रक्कम गुंतवल्यास ०७.१ टक्के एवढे व्याजदर मिळेल. यापूर्वी या योजनेचा व्याजदर हा ०७ टक्के एवढा होता.

केंद्र सरकार न दिलेल्या व्याजदर वाढ योजनेची यादी खालील प्रमाणे आहे:-

१) बचत ठेव: ४ टक्के व्याज देईल.
२) १-वर्ष पोस्ट ऑफिस वेळ ठेव: ६.९ टक्के व्याज देईल
३) २-वर्ष पोस्ट ऑफिस वेळ ठेव: ७ टक्के व्याज देईल
४) ३-वर्षे पोस्ट ऑफिस वेळ ठेव: ७.१ टक्के व्याज देईल
५) ५-वर्ष पोस्ट ऑफिस वेळ ठेव: ७.५ टक्के व्याज देईल
६) ५ वर्षांचे RD: ६.७ टक्के व्याज देईल
७) राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे (NSC): ७.७ टक्के
८) किसान विकास पत्र: ७.५ टक्के
९) PPF: ७.१ टक्के
१०) सुकन्या समृद्धी योजना : ८.२ टक्के
११) ज्येष्ठ नागरिक बचत योजना : ८.२ टक्के
१२) मासिक उत्पन्न खाते: ७.४ टक्के

Post a Comment

0 Comments