आमचं ठरलंय मुंबईत आंदोलन होणारच: मनोज जरांगे पाटील

आमचं ठरलंय मुंबईत आंदोलन होणारच: मनोज जरांगे पाटील



मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये ठरला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये मराठा समाज एकत्रित झाला आहे व आरक्षणासंदर्भात सकल मराठा समाज आंदोलन करत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील व शिष्टमंडळाने यापूर्वी राज्य सरकारला मुदतवाढ दिली होती परंतु आता कुठलीही मुदतवाढ मिळणार नाही असे मनोज जरांगे पाटील म्हटले आहे. आता पर्यंत आरक्षण देण्याच्या कुठल्याही हालचाली राज्य सरकार करत नाही म्हणून सर्व मराठा समाज आक्रमक झालेला आहे येणाऱ्या २० जानेवारी पासून आता मागे हटायचं नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये आंदोलन करणार आहे या आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील व शिष्टमंडळाने मुंबईमधील मैदानाची मागणी केली आहे.

मराठा आंदोलनासाठी कोणत्या मैदानाची मिळणार परवानगी ?

मनोज जरांगे पाटील यांचा नेतृत्वाखाली होणाऱ्या मराठा आरक्षणासाठी शिष्टमंडळाने मुंबईतील मैदानाची परवानगी मागितली आहे मुंबईमधील मैदानाच्या परवानगीसाठी अर्ज दाखल केले आहे व परवानगी मागितली आहे. मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस यांच्याकडे परवानगीसाठी पत्र व्यवहार केला आहे. आज पासून थोडेच दिवस शिल्लक असल्याने मुंबईमधील मराठा समाजाचे समन्वयक हे जालनामध्ये मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी गेले होते.

जालना येथे भेटण्यासाठी गेलेल्या मराठा समन्वयकांना मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनासाठी तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मैदानाच्या परवानगीसाठी मुंबईतील मराठा समाजातील समन्वयक हे पत्रव्यवहार व इतर तयारी देखील जोरदार पद्धतीने करत आहेत. जेणेकरून येणाऱ्या सर्व सकल मराठा समाजाला तिथे सर्व व्यवस्था होईल कुठल्याही अडचणीशी तोंड देण्याची वेळ येणार नाही.

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले ?

जालना मध्ये मनोज जरांगे पाटील असे म्हटले की दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सर्व मराठा समाज हा आरक्षणासाठी एका ताकतीने उभा राहिला आहे. आपल्याला पाठीमागच्या आयोगाचे निकष मागवावे लागतील त्यांचे काही निकष आहेत हेही मी मागवणार आहे. मैदान मागण्याचा विषय हा ज्याचा त्याचा आहे पण आम्ही २० जानेवारी रोजी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईला जाणार आहोत. परंतु राज्य सरकारला २० जानेवारी पर्यंत चर्चेसाठी दारू खुली आहेत २० तारखेपूर्वी सरकारला आरक्षण द्यावेच लागेल असे मनोज जरांगे पाटील म्हटले आहे.

सध्या मनोज जरांगे पाटील यांचा भरपूर गावामध्ये संवाद दौरा चालू आहे. जरांगे पाटील हे काल रात्री गोदाकाठच्या  कोठाळ गावात गेले असता त्यांच्या स्वागतासाठी ५१ ट्रॅक्टर ची भव्य रॅली काढण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांचा दौरा मराठा समाजाला एकत्रित करण्याचा व मुंबई मध्ये होणाऱ्या मोर्चामध्ये येण्याचे आवाहन करत आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी दिले आदेश


मनोज जरांगे पाटील हे माध्यमांशी बोलत असताना त्यांनी असे आदेश दिले आहेत की आपल्याला हा मोर्चा शांततेत व कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन किंवा गालबोट लागले असे काही कृत्य करायचे नाही असा आदेश सर्व सकल मराठा समाजाला दिली आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची घोषणा करताच त्यांनी असे म्हटले आहे की मुंबईला आम्ही ट्रॅक्टरने येणार आहोत असे म्हणताच राज्य सरकारने ट्रॅक्टर मालकांना नोटीसा पाठवले आहेत.

राज्य सरकारला आता कुठलेही प्रकारचा वेळ वाढवून मिळणार नाही त्यांनी आता मराठ्याचा अंत बघू नये व सर्व मराठा समाजाला कुणबी दाखले द्यावे असे मनोज जरांगे पाटील म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments